Autobiography of an umbrella in marathi sardar

Autobiography Of A Umbrella Essay Make happen Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत छत्रीचे मनोगत वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही छत्रीचे आत्मवृत्त, छत्रीची आत्मकथा आणि मी छत्री बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.

छत्रीचे मनोगत मराठी निबंध Autobiography Devotee A Umbrella Essay In Marathi

मी एक छत्री बोलत आहे. माझा उपयोग पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसापासून मी तुमचे रक्षण करते.याशिवाय उन्हाळ्यातही माझा उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी मला वापरले जाते.

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी मी काढून बाजूला टाकते. शिवाय उन्हाळ्यात पडणाऱ्या सूर्याचे ऊन शरीरावर पडल्यापासून मी तुमच्या संरक्षण करते,परंतु जास्त करून माझा उपयोग पावसाळ्यातच केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही मला आजूबाजूला पाहू शकता. पावसाळ्याच्या दिवसात मी खूप उपयोगी वस्तू बनवून जाते या दिवसात माझी खूप काळजी घेतली जाते.

मी रंगेबिरंगी व वेगवेगळ्या रंगांमध्ये येते .परंतु जास्त करून काळ या रंगांमध्ये लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात. रंग कोणताही असो आमचे कार्य सारखेच असते.  पावसाळा सुरू होण्याअगोदरच माझी वेगवेगळी रूपे बाजारात उपलब्ध असतात. लांब दांडियावली, आणि घडी घालता येणारी छत्री मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. परंतु लोकांना घडी घालता येणारी छत्री जास्त आवडते. कारण माझ्या या रूपाला फोल्ड करून बॅग व पिशवी मध्ये ठेवता येते.

पावसाळ्यातील वादळा मुळे  बर्‍याचदा मला कठीण संकटांना पुढे जावे लागते, पाऊस वादळी वारे मला उडवून देण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या प्रमाणात आलेल्या हवेमुळे भरायचा माझ्यातील तार तुटतात. अशा तुटलेल्या परिस्थितीत मी माझ्या मालकाचे योग्य पद्धतीने रक्षण  करण्यास असमर्थ होते परंतु तरीही मी थोडेफार का होईना भिजल्या पासुन वाचवते.

पावसाळ्यात तर माझी मौज असते परंतु दुसरीकडे पावसाळ्याचे चार महिने संपले, की मी घराच्या कोपऱ्यात पडून राहते .वाट पाहत राहते कि केव्हा पाऊस येईल व केव्हा कोणीतरी मला उघडून थंड पावसाचा स्पर्श करते .मला लोकांची मदत करायला आवडते .स्त्री असो वा पुरूष मी प्रत्येकाला पावसात भिजल्या पासून वाचवते.

” मला लोक छत्री छाता किंवा अम्ब्रेला अशा निरनिराळ्या नावांनी ओळखतात. तसेच निरनिराळ्या आकाराच्या छत्र्या बनविल्या जातात”

लहान मुले तसे तर रेनकोटची जास्त वापरतात परंतु आपल्या आई-बाबांना सारखी आपल्याकडेही एक छानशी छत्री असावी हा मोह तुम्हा सर्व मुलांना नेहमीच असतो .आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्यासारख्या छोट्या-छोट्या आकर्षित करणाऱ्या छत्र्या बनविण्यात येतात.

मलाही तुझ्या आईने तुझ्यासाठी विकत घेतली आली होती त्यावेळी मला दुकानातून तुझी आई घरी घेऊन आली त्यावेळी मी खूपच घाबरली होती कारण मला आता माझ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावे लागणार होते ,परंतु जेव्हा मी तुझ्या घरी आले मला बघून खूपच  झालास मला खूप जपून वापरायचा.

मला अजूनही आठवते की जेव्हा रिमझिम पाऊस पडत असेल तेव्हा तू नेहमी घराच्या अंगणात मला घेऊन पावसात जात असे शाळेचा पहिला दिवस होता .त्या दिवशी तू मला स्वतःबरोबर खूप हौसेने शाळेत नेले होते आणि कोठेही हरवू नये म्हणून तू सतत माझ्यावर लक्ष ठेवून होता. हे अजूनही आठवते.

माझ्याबरोबर तु पावसाचा खूप आनंद घेत होता मला ज्या सुंदर कपड्याने बनविले होते ,त्याला गोलाकार वाकून लावलेल्या तारांमुळे मी छान बनली आहे. त्यामुळे मला तु पावसात गोल गोल फिरून त्याच्या रिमझिम थेंबांची तू मजा घेत असत.

एकदा अचानक माझ्या दोन तारा कपड्यातून बाहेर येऊन माझे रंगीबिरंगी कापड फाटले गेले त्यावेळी तू खूप रडला होतास. होय! तुझी ही आवडती छत्री त्यादिवशी मोडून पडली होती. ज्यावेळी तू तुझ्या या छत्री चे बटन सारखे बंद चालू करून खेळत होता त्यावेळी तुझ्यासाठी ते मनोरंजन होते परंतु त्यामुळे ते बटण नही निकामी झाले.

मग काय? माझी रवानगी अडगळीच्या ठिकाणी झाली कालांतराने पावसाळा संपला. आणि तू मला विसरून गेलास. आईने मात्र मला जपून ठेवली कारण तू माझ्या बरोबर खूप खेळायचा आज इतर छत्र्या बरोबर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला तुझ्याबरोबर बोलावेसे वाटले.

एक छत्री म्हणून माझी तुम्हा सर्वांकडे काहीच तक्रार नाही परंतु एकच काकुळती ची विनंती नक्की आहे की जी छत्री तुमचे पावसाळ्यात तर संपूर्ण संरक्षण करते परंतु उन्हाळ्यातही उन्हापासून बचाव होण्यासाठी खूप लोक माझा उपयोग करतात अशा या तुमच्या छत्रीला नीट सांभाळा जर का ती कुठे फुटली किंवा फाटली असेल तर वेळेतच दुरुस्त करून घ्या म्हणजे ती कायम तुम्हाला साथ देत राहील.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-